InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

चित्रपटाच्या इतिहासात ट्रेलरचं पहिल्यांदाच गडावर लोकार्पण

‘पोस्टर गर्ल’सारखे अनेक उत्तम चित्रपट लिहिलेला अभिनेता हेमंत ढोमे ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे. हेमंतनंच चित्रपटाचं लेखन केलं आहे. 
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट, गणराज प्रॉडक्शन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर लोकार्पण कार्यक्रमाला निर्माते गोपाळ तायवाडे, वैष्णवी जाधव, संजय छाब्रिया, दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील, संगीतकार अमितराज 
गीतकार क्षितिज पटवर्धन, संकलक फैजल महाडिक आदी या वेळी उपस्थित होते. खास या कार्यक्रमासाठी 
राज्यभरातील गडकोटांच्या संवर्धनसाठी स्वयंस्फूर्तीनं कार्यरत असलेल्या २२ संस्थांचे प्रतिनिधीही आले होते. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’च्या घोषानं वातावरण दणाणून गेलं होतं.

‘छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नव्हते आणि आजही नाहीत. मात्र, त्यांच्या नावानं केलं जाणारं राजकारण अत्यंत चुकीचं आहे. गडकोटांच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी तरूणानं पुढाकार घेतला पाहिजे,’ असं जितेंद्र जोशीनं सांगितलं.

‘आज अनेक तरूण आणि संस्था गडकोटांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहेत. चित्रपटातील तरूण हे त्यांचेच प्रतिनिधी आहेत, ‘बघतोस काय मुजरा कर’ हा एक चित्रपट नसून एक चळवळ आहे ‘ असं हेमंत ढोमेनं सांगितलं. चित्रपटाच्या टीमनं मशाल पेटवून गडकोट संवर्धन करणाऱ्या तरूणांच्या हाती देत ट्रेलरचं प्रतिकात्मक लोकार्पण केलं.

ट्रेलरचं लोकार्पण झाल्यानंतर आलेल्या स्वयंस्फूर्ती संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांना गडकिल्ले संवर्धन करताना येणारे अनुभव लोकांसमोर मांडले. या कार्यक्रमाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुक, ट्विटर अशा साईट्सवर हा ट्रेलर व्हायरल झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.