InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची बसपा अध्यक्षा मायावती यांची घोषणा

बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी 2019 ची लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मायावती यांनी स्पष्ट केलं की, ‘सध्या मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे मला वाटलं तर कोणतीही जागा रिक्त करत निवडणूक लढवून मी लोकसभा खासदार होऊ शकते.

उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसने सपा आणि बसपा यांच्या आघाडीसाठी काँग्रेसने 7 जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता. यावर ट्विट करत मायावती यांनी काॅंग्रेस बरोबर कोणतीही आघाडी झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसने जबरदस्तीने उत्तर प्रदेशात सपा-बसपा-रालोदला 7 जागा सोडल्याची अफवा पसरवू नये.असे मायावती म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.