InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बजाजच्या बाईक होणार महाग

नवी दिल्ली: येणाऱ्या नववर्षात तुम्ही जर बाईक खरेदी करायचा विचार करत असाल आणि त्यातही तुम्ही जर बजाजची कोणतीही बाईक खरेदी करायचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण, येत्या जानेवारीपासून बजाज आपल्या बाईकच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढीव किंमत साधारण 1500 रूपये इतकी असू शकते. उत्पादनखर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात येत असल्याचे कंपनीच्या सुत्रांनी म्हटले आहे.

दरवाढीबाबत बोलताना बजाज ऑटो लिमिटेडचे अध्य़क्ष (मोटरसाईकल) इरिक व्यास यांनी सांगितले की, येणाऱ्या वर्षातील एप्रिल महिन्यापासून देशात केवळ बीएस-4 स्टॅंडर्डवाल्या बाईकच विकण्यात येतील. त्यामुळे सर्व बाईक आम्ही अपग्रेज करत आहोत. तसेच आम्ही यात अव्वल बनन्याचा प्रयत्न करत आहोत, असेही व्यास यांनी म्हटले आहे. दरम्यान, बजाज आपल्या बाईकची किंमत साधारण 700 रूपयांपासून ते 1500 रूपयांच्या पटीत वाढवू शकते.

डोमिनर 400वर कोणताच परिणाम नाही

बजाजने नुकतीच लॉंच केलेली डोमिनर 400 या बाईकवर या दरवाढीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे समजते. डोमिनर-400  ही एक स्पोर्ट बाईक असून, दिल्लीतील एका शोरूममध्ये या बाईकची किंमत 1.3 लाख रूपये इतकी सांगितली जात आहे. ही किंमत अगदी सुरूवातीच्या काळातली आहे. कंपनीने ही बाईक ABS (ऍण्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम)आणि नॉन-ABS अशा दोन व्हर्जनमध्ये लॉंच केली आहे.दिल्लीतील एका शोरूममधील किंमती नुसार एबीएस व्हर्जनची किंमत ही 1.5 लाख रूपये इतकी आहे. तर, दूसऱ्या व्हर्जनची किंमत 1.3 लाख इतकी आहे.

डोमिनर 400 च्या फिचर्सबाबत बोलायचे तर, या बाईकला 37ccचे सिंगल सिलिंडर DTS-i इंजिन आहे. हे इंजिन 34.5bhp पॉवर आणि 35Nm इतकी क्षमता निर्माण करते. या दोन्ही बाईकला स्लिपर क्लचसोबत 6-स्पिड गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे. तर, 320 mm फ्रंट आणि 230 mm रियर डिस्क ब्रेक आहेत. ही बाईक 8.32 सेकंदात 0 ते 100 किमी इतक्या वेगाने जाते असा कंपनीचा दावा आहे. बाईकचा टॉप स्पीड 148kmph इककी आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply