InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बजाजची ‘डॉमिनर 400’ ही शानदार बाईक भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

- Advertisement -

देशातील प्रमुख टू व्हिलर निर्मिती करणारी कंपनी बजाज ऑटोने आज त्यांची नवी शानदार ‘डॉमिनर 400’ ही बाईक लॉन्च केली आहे. ही ४०० सीसीची दमदार बाईक असून देशभरातील शोरूममध्ये बजाजच्या या नव्या बाईकची विक्री सुरू होणार आहे. या बाईकच्या स्पेशिफिकेशनबद्दल बोलायचं तर बजाज डॉमिनर ४०० मध्ये ३७३ सीसीचं सिंगल ऑईल कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे.

WhatsApp Image 2016-12-15 at 1.16.57 PM

WhatsApp Image 2016-12-15 at 1.08.38 PM (1)

- Advertisement -

बजाजची ही ‘डॉमिनर 400′ नवी बाईक आतापर्यंतची सर्वात जास्त इंजिन क्षमता असलेली बाईक आहे. या बाईकचं नाव डॉमिनर स्पॅनिशवरून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ ‘एक्सीड इन पॉवर म्हणजेच ऊर्जा असा होतो. या बाईकमध्ये ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली असून त्यातील एकाची किंमत १ लाख ३६ हजार इतकी ठेवण्यात आली आहे. तर डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत १ लाख ५० हजार इतकी ठेवण्यात आली आहे.

WhatsApp Image 2016-12-15 at 1.32.38 PM

तर या बाईकमध्ये ३५ बीएमपीची पॉवर देणारं इंजिन आहे. जे केटीएम ड्य़ूक ३९० मध्ये आधी आहे. बजाज ऑटो या बाईकला पॉवर क्रूजरच्या रूपात सादर करीत आहे. यात अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम(एबीएस) स्टॅंडर्ड फिचर्सच्या रूपात येतं. डॉमिनर 400 मध्ये डिजिटल डिस्प्ले लावण्यात आला आहे आणि याच्या फ्य़ूल टॅंकवरही डिजिटल कंसोल देण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.