InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मदरशातील विद्यार्थ्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये गुरुवारी या घटनेची पुनरावृत्ती झाली असून एका मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला सांगत मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर इतर ३ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

एफआरआरमधील आरोपांनुसार, उन्नावमधील दार-उल-उलूम फियाज-ए-आम नावाच्या मदरशात शिकणाऱे १२ ते १४ वर्षांचे काही विद्यार्थी येथील एका मैदानावर क्रिकेट खेळत होते. त्यावेळी मैदानात बजरंग दलाचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना जय श्रीराम म्हणण्यास सांगितले मात्र, या विद्यार्थ्यांनी असे करण्यास नकार दिल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बॅट आणि स्टम्पने मारहाणीला सुरुवात केली. यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.