InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बजरंग जाधव यांची भाजपातून हकालपट्टी 

- Advertisement -

औसा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचेच जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

औसा विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांना अभिमन्यू पवार यांना उमेदवारी  जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारी न मिळाली मिळाल्याने त्यामुळे इतरांनाही अडचणीत आणण्याच्या हेतूने बजरंग  जाधव यांनी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी “दाखल केली. पद असतानाही त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. हा पक्ष शिस्तीचा भंग ठरतो.

Loading...

शिस्तप्रिय पक्ष असणाऱ्या भाजपाने या बाबीची गंभीर दखल घेतली. पक्षाच्या व महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यानुसार राज्यात अनेकांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्याच पद्धतीने बजरंग जाधव यांना देखील भाजपातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

- Advertisement -

Loading...

ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले, स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी आणि पदही दिले त्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणे जाधव यांना चांगलेच महागात पडले आहे. उमेदवारी तर नाहीच परंतु, सध्या त्यांच्याकडे असणारे पदही त्यांना सोडावे लागणारआहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.