बजरंग पुनियाचा धमाकेदार एकतर्फी विजय, ब्रॉन्झ पदकाची कमाई

टोकियो : ऑलिम्पिकमधून भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची वाढ झाली आहे. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. बजरंगने कझाकस्तानचा कुस्तीपटू याचा 8-0 अशा एकतर्फी अंतराने पराभव केला आहे.

बजरंगने दौलेत नियाझबेकोव्हला 65 किलो वजनी गटात अस्मान दाखवलं. बजरंगने हा सामना जिंकल्याने भारताने या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 6 वं पदक पटकावलं आहे. 25 वर्षीय बजरंग आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे.

जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. नुकतंच त्याने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे, तर राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्ण पटकावलं होतं. केंद्र सरकारने त्याचा अर्जुन पुरस्कार आणि यंदा ‘पद्मश्री’ने गौरव केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा