“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”

मुंबई : “खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन, मात्र अजून माझं वचन पूर्ण झालेलं नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हणाले होते.यावरून भाजप नेते निलेेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. काय नाटक आहे? कसलं कर्तव्य आणि कसलं काय, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरवरून निशाणा साधला आहे.

“काय नाटक आहे. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे. कसलं कर्तव्य आणि कसलं काय. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसला कायमचा गाडून टाका. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा