InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार ?

मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तर, भाजपने आधीच दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच नाव देण्याची घोषणा केली होती.

महामार्गास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव ठाकरे सरकार मोडीत काढणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा सरकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Loading...

देशातील पहिल्या वहिल्या मुंबई— पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेबांनी रोवली होती. त्यामुळे देशातील या पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचा, त्यांच्या दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.