बाळासाहेब ठाकरेंनी विमानतळाला स्वत:चे नाव देण्यास नाकारले असते : छगन भुजबळ

नवी मुंबई : नवी मुंबई विनानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मात्र यानंतर आता एकनाथ शिंदेंनंतर यावर राष्ट्रवादीने वक्तव्य केलं आहे.

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चे नाव देणे नाकारले असते, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे विधान केले. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वतःचे नाव विमानतळाला दिले नसते. त्यांनी जे. आर. डी. टाटांचे नाव विमानतळाला सुचवले असते.

पुढे नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. बाळासाहेब आणि दि.बा. पाटील या दोन्ही नावाला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नामकरणाच्या मुद्यावर थेट शिवसेनेला सुनावतानाच भुजबळांनी नरो किंवा कुंजरोवाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा