Balasaheb Thorat | “एकानाथ शिंदे मुख्यमत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल

Balasaheb Thorat | नाशिक : राज्यात सत्तांतर होऊन आता ९ महिने होत आलेत. मात्र अजूनही महाविकास आघाडीचे नेते सरकार कोसळल्याचं दु:ख विसरु शकत नाहीत. आजही ती सल बोलून दाखवतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते वारंवार त्या मुद्द्यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shivsena) टीका करत असतात.

आज एक अनोखच चित्र पहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंचावर बसलेले असताना काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले आहे.

“शिंदे मुख्यमंत्री झाले, आमची संधी घालवली”

“एकनाथ शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहात. संधी मिळालेली आहे. काम करताय. आमची संधी घालवली हे खरंय. पण गडी मेहनती आहे हे विसरुन जाता येत नाही. जो काही वेळ मिळाला आहे, जी संधी मिळाली आहे ती त्या संधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम करण्याचा प्रयत्न आपण करत आहात ते आम्ही मनापासून पाहतोय ते नाकारता येत नाही”, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

Balasaheb Thorat talk about CM Eknath Shinde

“हे सगळं जे लोकशाहीत आहे ते आपण सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याकरता आपण करत असतो. तो आनंद निर्माण करण्याची जबाबादारी लोकशाहीने सर्व पक्षांना दिली तशी आपल्यावरही दिलेली आहे. शेवटी ते कार्य आपण एकत्रित करणं हे खरं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श आपल्यासमोर असला पाहिजे. पंकजा ताई त्यांचा समर्थ वारसा पुढे नेत आहेत याचं आम्हाला कौतुक आहे”, असं देखील बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.