Balasaheb Thorat | “काहीतरी शिजत आहे, याचा वास…”; अजित पवारांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान

Balasaheb Thorat | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे.

Ajit Pawar used to verbally attack Chief Minister Eknath Shinde only – Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, “अजित पवार फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल करायचे. अजित पवार कधीच देवेंद्र फडणवीसांबद्दल (Devendra Fadnavis) बोलायचे नाही त्यांना ते मोकळे सोडायचे. या सर्व गोष्टी आम्हाला जाणवत होत्या. काहीतरी शिजत होतं आणि त्याचा वास आम्हाला येत होता.”

पुढे बोलताना ते (Balasaheb Thorat) म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात चांगल्या पद्धतीनं काम केलं. महाविकास आघाडी पाच वर्ष पूर्ण काम करेल, असं आम्हाला वाटत होतं.

मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर आमचं सरकार पडलं. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आम्हाला वास देखील आला नव्हता याचं आम्हाला जास्त आश्चर्य वाटतं.”

“एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा आम्हाला नवीन धक्का मिळाला. काहीतरी होणार याची आम्हाला चाहूल लागली होती. तेव्हाच अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदारांचा आकडा अद्याप करू शकलेला नाही. काहीतरी शिजत होतं आणि आम्हाला त्याचा वास येत होता. कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र खूप चांगलं काम केलं आहे”, असही ते (Balasaheb Thorat) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Dgk629