अशोक चव्हाण बरोबरच बोलले, काँग्रेसमुळेच सरकार सत्तेत आहे ; बाळासाहेब थोरात

मुंबई : २०१९ ला शिवसेनेने २५ वर्षे सुरु असलेली भाजपासोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनीं राज्यात महाविकासआघाडी स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्व काही आलबेल आहे ना असा सवाल उपस्थित होत आहे.

यानंतर आता पुन्हा एकदा सुर काँग्रेसने गवसला आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असा पुनरुच्चार काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. जालन्यामध्ये एका प्रचार समभेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे, असेही ते म्हणाले होते.

यावर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी अशोक चव्हाणांच्या वरील वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज्यात तीन पक्ष आहेत, त्यात काँग्रेसचे महत्व आहे . अशोक चव्हाण बरोबरच बोलले. काँग्रेस आहे म्हणूनच सरकार आहे, असे थोरात म्हणाले. राजकारण आणि निवडणुका यावरही थोरात यांनी भाष्य केले. तर भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही नवी मुंबईत एकत्र येत असल्याची माहितीही थोरात यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा