शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीबाबत बाळासाहेब थोरात यांचे मोठे वक्तव्य…

मुंबई : शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार असल्याचं उघड उघड जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या युतीचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा पुनरुच्चार केला आहे. हल्ली राजकीय पक्षांना स्वबळाचं अजीर्ण नक्कीच झालं आहे.

भाजप म्हणते आम्ही स्वबळावर लढू. भाजप एकटाच आहे. त्यामुळे स्वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच मुद्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

स्वबळावर लढून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणं यात चुकीचं काय आहे? भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करत आहेत हे चांगलंच झालं. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचं सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलंच आहे, असं सुचक वक्तव्य सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

यावर आता कॉंग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या युतीच्या शक्यतेवर भाष्य केले आहे. ‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो हे समोर ठेवून पुढे काम करू’. असं थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा