ममतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांचा जोरदार पलटवार

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्या भेटणार होत्या. पण प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेवरर निशाणा साधला. तसेच ममता बॅनर्जीं यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही हल्लाबोल केला. एखाद्याने काहीच करायचं नाही आणि फक्त विदेशात राहायचं. अशाने काम कसं चालेल? तुम्ही फिल्डवर राहणार नाही, तर भाजप तुम्हाला बोल्ड करेल. तुम्ही फिल्ड रहाल तर भाजपचा पराभव होईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

तर ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यांवर कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी यांनी या टिकेवर कॉंग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे. भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात कॉंग्रेसच लढत आहे हे देशाला माहीत आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षांसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. कॉंग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा