दिल्ली काबीज करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंचा एल्गार

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तसेच त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे. या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, बाबरी मशीद पडल्यानंतर संपूर्ण देशभरात शिवसेनेची लाट उसळली होती. त्याचवेळी शिवसेनेने देशभरात सीमोल्लघंन केले असते, तर आज शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच, भाजपबरोबरच्या युतीत २५ वर्षे सडली, याचा आज पुन्हा पुनरुच्चार केला.

आपल्याकडे मोठा वारसा आहे. दिल्लीत शिवसेना प्रमुखांचा पुतळा उभारण्याचं काम आपण करुच. पण दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दाखवलं ते आपण पूर्ण करणार आहोत की नाही? ते जर आपण करणार असू तर या सर्वाला अर्थ आहे, अन्यथा सर्व निरर्थक आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या