Balika Vadhu | बालिका वधूमधील ‘या’ अभिनेत्रीने केली प्रेग्नेंसीची घोषणा

मुंबई : बॉलीवूडमध्ये आलिया-रणबीर (Alia-Ranbir), करण-बिपाशा (Karan Bipasha) यांनी आपल्या कुटुंबामध्ये गोंडस लक्ष्मीचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर टीव्ही इंडस्ट्रीतील देबोलीना बॅनर्जी हिने देखील एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. अशा परिस्थितीत आता ‘बालिका वधू’ (Balika Vadhu), ‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhala Ja) या शोमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने गुड न्यूज शेअर केली आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘बालिका वधू’ (Balika Vadhu) मधील ‘या’ अभिनेत्रीने केली प्रेग्नेंसीची घोषणा

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आम्ही कोणत्या बालिका वधू मधील अभिनेत्रीमध्ये बोलत आहोत. तर आम्ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नेहा मर्दा (Neha Marda) बद्दल बोलत आहोत. नेहाने नुकतच सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. बालिका वधू या मालिकेसोबतच नेहाने ‘डोली अरमानो की’ आणि ‘रिश्तो की कट्टी बट्टी ‘यासारख्या सिरीयलमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर नेहा ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये देखील सहभागी झाले होती.

नेहा मर्दाने तिच्या पतीसोबत सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. या फोटोमध्ये नेहा पतीसोबत उभी आहे. तिच्या पतीने या फोटोमध्ये कोट पॅन्ट परिधान केलेला असून नेहाने लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे. नेहाच्या या ड्रेस मध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या पोस्टनंतर नेहाच्या चाहत्यांना तिच्या बाळाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे.

टीव्ही इंडस्ट्री लोकप्रिय अभिनेत्री नेहा मर्दा हिने पटना येथील व्यापारी आयुष्यमान अग्रवाल सोबत विवाह केला होता. नेहा आणि आयुष्यमान हे जोडपे लग्नाच्या दहा वर्षानंतर आपल्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी सुसज्ज आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.