InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणतो…. दारुबंदी उठवा

- Advertisement -

राज्यातील काँग्रेसचे एकमेव विजयी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरातील दारूंबदी हटवण्याची मागणी केली आहे. चंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे दारुबंदी हटवा, असे धानोरकर म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

धानोरकर म्हणाले की, “दारुबंदी हा विषय चुकीचाच होता. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघामध्ये 15 हजारांच्या मतांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. इथे मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले. दारुबंदीसाठी ज्या नियम आणि अटी ठेवल्या होत्या, त्याची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु आहे. सरकारचा महसूल सुद्धा बुडालेला आहे. लोकांना तो पटणारा विषय नाही. एका जिल्हात दारुबंदी करुन काय साध्य करणार आहे. तुमच्या हातात केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश आहे. पूर्ण राज्यात दारुबंदी करायला हवी.”

- Advertisement -

धानोरकर हे महाराष्ट्रात विजयी झालेले काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.