Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू
Bank of Baroda | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 220 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये झोनल सेल्स मॅनेजर 11 जागा, रीजनल सेल्स मॅनेजर 09 जागा, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट 50 जागा, सिनियर मॅनेजर 110 जागा, मॅनेजर 40 जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Bank of Baroda) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
बँकेच्या (Bank of Baroda) या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBMSME2023/
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1tWLO_tUQJLSxItKJicaSksvSr39gD69M/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेतील 14 व्या हप्ताबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या सविस्तर
- Pickel Side-effects | दररोज लोणच्याचे सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम
- Ordnance Factory | ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका, पाहा हवामान अंदाज
- Sharad Pawar | कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देणार; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा!
Comments are closed.