Bank of Baroda | BOB मध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Bank of Baroda | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 546 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये संपादन अधिकारी, प्रादेशिक संपादन व्यवस्थापक, राष्ट्रीय अधिग्रहण प्रमुख, हेड-वेल्थ टेक्नॉलॉजी, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, ट्रेड रेग्युलेशन – सीनियर, मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकर, प्रोडक्ट हेड आणि रेडियंस-प्रायव्हेट सेल्स हेड पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 14 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1VqZ1hP3CqIhV3dCHco6SVBjrnmek9Sit/view
संपादन अधिकारी पदांसाठी जाहिरात
https://drive.google.com/file/d/1S1RztKkwc-9ZnfNVCYXfua0OPYsGQBBH/view
अधिकृत वेबसाइट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Hair Fall | ‘या’ गोष्टी थांबवू शकतात केस गळती, जाणून घ्या
- RRR | अभिमानस्पद! हॉलीवुडमध्ये पुन्हा एकदा भारतीय चित्रपटाचे वर्चस्व, RRR ठरला जगातला सर्वोत्कृष्ट चित्रपट
- Job Opportunity | आयकर विभागात ‘ही’ रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | पुढील पाच दिवस काय असणार तापमानाची स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज
- Devendra Fadnavis | “ठाकरेंनी सगळ्यात मोठी फसवणूक केली कारण त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढल्या”
Comments are closed.