InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुख्यमंत्री म्हणतात, लोकसभेसाठी पुण्यातून बापट – शिरोळे नको?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमकडून नवीन चेहऱ्यांबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुण्याच्या जागेसाठी भाजपकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ आणि आमदार योगेश मुळीक यांच्या नावाबाबत विचार सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांची ही चाचपणी गिरीश बापट आणि अनिल शिरोळे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. कारण या जोडीचं पुण्यातील भाजपवर कायमच वर्चस्व राहिलं आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या दोन नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत तिकीटासाठी रस्सीखेच झाली होती.

पण या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी या दोघं बाजूला करत नवा खेळ मांडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पक्षाचा पराभव, महाआघाडी यामुळे भाजप नव्या चेहऱ्यांचा विचार करत आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.