“बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण तो देखील जिंकू”

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत आजच्या सामनामधून उपमुख्यंमत्री अजित पवार यांची बाजू घेताना पहायला मिळाले आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी अजित पवारांना उद्देशून भाष्य केले. संजय राऊत यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकारी मार्गदर्शक मेळावा घेतला. यावेळी बोलताना राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पालकमंत्री आपले नाहीत परंतु राज्यात आपली सत्ता आहे. इथं आपलं कोणीच ऐकत नाही, असं म्हटलं जातं. मुख्यमंत्री आपले आहेत पालकमंत्री देखील आपलेच आहेत. अजित पवारांना सांगू आमचं ऐका. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला असे विधान करताच एकच हशा पेटला. तर असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे राऊत यांचं राष्ट्रवादीला हे थेट आव्हानच आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

यानंतर राऊत यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवत बारामतीही आपण जिंकू शकतो, असे वक्तव्य केले आहे. तिकडेही लोक आहेत. पुरंदर जिंकले की बारामतीही आपण जिंकू शकतो. भले बारामतीत आपल्या जागा निवडून येणार नाहीत. पण आपली ताकद तर वाढेल. त्यामुळे आपण आपली ताकद वाढवू शकतो ही सकारात्मकता राहिली पाहिजे. तसेच बारामती जिंकण्याचा संकल्प सोडत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा