InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कांचन कुल यांना उचलून घेत आमदार राहुल कुल यांनी चढल्या जेजुरी गडाच्या पायऱ्या

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार कांचन कुल यांना उचलून घेत पती आमदार राहुल कुल यांनी जेजुरी गडाच्या पाच पायऱ्या चढल्या. यानंतर गड़ावरील 42 किलोची खंडा तलवारही आमदार राहुल कुल यांनी उचलून घेतली.

कांचन कुल यांनी जेजुरी भागात प्रचार दौरा केला. यावेळी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन त्यांनी घेतलं. यावेळी कुल दाम्पत्यांने जेजुरीच्या खंडेरायाचे पारंपरिक पद्धतीने दर्शन घेत महापूजा देखील केली.

याआधी सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळेंनीही शिवरात्रीला खंडेरायाचं सपत्नीक दर्शन घेतलं. सदानंद सुळेंनीही सुप्रिया सुळेंना उचलून घेत जेजुरी गडाची पायरी चढली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.