बारामती हादरलं ! अजित पवारांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांवर गोळीबार

 बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर आज (३१ मे) संध्याकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात तावरे यांच्या पोटात गोळी लागल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तावरे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येत असून पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली आहे.

संपूर्ण बारामती तालुका या घटनेमुळे हादरला आहे. रविराज तावरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, तसेच अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांपैकी एक असून ते जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. माळेगावात तावरे यांचे मोठे नाव असल्याचे म्हटले जाते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा