InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद’

दुकानातील उधारी बंद व्हावी यासाठी, दुकानदार अनेक शक्कल लढवत असतात, मात्र सोलापुरातील एका सलुनवाल्याने नामी शक्कल लढवली आहे. माढा शहरातील सचिन जेन्टस पार्लरमध्ये मालकाने ‘राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत उधारी बंद’ अशी पाटी लावली आहे.

सध्या ही अफलातून पाटी सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. या पाटीमुळे अनेक लोक कुतुहलापोटी या दुकानात गर्दी करत आहेत. तसेच लोकांनी सलूनवाल्याला दाढी केल्यानंतर, केस कापल्यानंतर रोख पैसे देणे सुरु केले आहे.

यावर बोलताना, सचिन म्हणतात, मी राहुल गांधी यांचा मोठा चाहता आहे. त्यांचा अवमान करणे हा करण्याचा माझा उद्देश नाही. मी केवळ दुकानातील उधारीचे व्यवहार बंद व्हावेत यासाठी ही पाटी लावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply