Barsu Refinery Project | कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ; म्हणाले…

Barsu Refinery Project | रत्नागिरी : गेल्या दोन दिवसापासून रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तर या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध करत दोन दिवस झाले आंदोलन केले आहे. याबाबत राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जातं आहेत. तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी याबाबत मोठं वक्तव्य करत म्हटलं आहे की, कोकणातील हा प्रकल्प नियोजित ठिकाणीच होईल व राज्याच्या विकासासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे कोकण रिफायनरी प्रकरण चिंगळनार असल्याचं चित्र दिसतं आहे.

काय म्हणाले फडणवीस? (What did Fadnavis say)

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जो कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्यामुळे तेथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नसून महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. तर बारसू गावात सध्या रिफायनरीच्या ठिकाणी बोअर मारले जात आहेत. ही जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचं अहवाल आल्यानंतर रिफायनरी उभी राहणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसचं हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे असं देखील फडणवीस म्हणाले.

दरम्यान, रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात अपप्रचार सुरू आहे. तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य भूमिका घेऊन या प्रकल्पातील तीन कंपन्यांना एकत्र घेऊन एकाच ठिकाणी सुरू करण्याचं ठरलेलं आहे. महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या जागेसाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. परंतु आता ते विरोध करत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. याचं प्रमाणे राज्यात जो आरेतील कारशेडला देखील विरोध करण्यात आला होता. जर कोणताही प्रकल्प आला तरी विरोध करतात. यामुळे हा प्रकल्प होणारच याला विरोध करू नये असं देखील फडणवीस यांनी आंदोलन करणाऱ्यांना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-