Barsu Refinery Project | बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये मतभेद; वाचा सविस्तर
Barsu Refinery Project | मुंबई : कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून स्थनिकांनी जोरदार आंदोलन केलं आहे. ते आंदोलन शांत होण्याचं नाव घेत नाही तर आधीच चिंगलेलं पाहायला मिळत आहे. तर आज (29 एप्रिल) बारसू रिफायनरी विरोधातील मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चना उधाण आलं आहे. तर आता शरद पवार ( Sharad Pawar ) आणि उद्धव ठाकरे यांच्यात या प्रकरणावरून मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे.
स्थानिक लोकांना विश्वासात घ्या : शरद पवार (Trust local people: Sharad Pawar)
रिफायनरी प्रकल्पाबाबत गेल्या दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती त्यावेळी शरद पवार यांनी उदय सामंत यांना अनेक सल्ले दिले. त्यावेळी पवार म्हणाले, स्थानिक लोकांना विश्वासात घ्या, चर्चा करा. सर्वपक्षीय बैठक घेऊन आंदोलनकर्त्याशी चर्चा करून मार्ग काढू असं शरद पवार म्हणाले. परंतु त्यांच्या या भाष्यवर चर्चा करा म्हणजे काय करायचं? असा उलट सवाल संजय राऊतांनी केला. स्थानिक लोकांचा सरकारवर विश्वास नाही असं राऊत म्हणले. तर या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे ठाकरे गटाने विरोधी भूमिका दर्शवली असल्याचं पाहायला मिळतं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्थानिक जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असल्याचं म्हटलं आहे. तसचं माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीचा आग्रह होता म्हणून पर्याय आम्ही सूचवला. पण ती जागा घेण्यासाठी मविआने कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. या मोर्चात उद्धव ठाकरेदेखील जाणार आहेत. हे प्रकरण चिघळण्याआधी, सर्वेक्षण आणि भूसंपादन राज्य सरकारनं मागे घ्यावं. यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Mahavitaran | महावितरण सोलापूर यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- IPL 2023 | CSK मधील ‘या’ महाराष्ट्राच्या खेळाडूला Dhoni का देत नाहीये संधी?
- Eknath Shinde। “बदला घेण्याची, सूड घेण्याची..” ; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल!
- Job Opportunity | ST महामंडळामध्ये नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
Comments are closed.