Barsu Refinery Project | रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत अन् शरद पवार यांच्या भेटीमध्ये काय ठरलं ? ; वाचा सविस्तर

Sharad pawar | मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील बारसू येथील सुरू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) स्थानिकांकडून कडाडून विरोध होत आहे. यामुळे तेथील स्थानिक लोकांनी आंदोलन केलं असून माती सर्वेक्षण करताना अडचणी येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून एकमेकांना वर टीका टिप्पणी सुरू आहे. या प्रकल्पाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच या जागेवर प्रकल्प व्हावा आहि मागणी करण्यात आली होती त्याला केंद्र सरकारने मंजूरी देखील दिली परंतु आता ठाकरे गटानेही स्थानिकांच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं असून सरकराच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकारनाचा मध्यबिंदू काढून हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचं आहे. यासाठी आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांनी शरद पवार ( Sharad Pawar) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली.

स्थानिकांशी चर्चा करा, चर्चेतून तोडगा काढा : शरद पवार (Discuss with locals, find solution through discussion: Sharad Pawar)

तसचं उदय सामंत यांनी चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं की, शरद पवार यांच्या मते स्थानिकांचे प्रश्न सरकारने समजून घ्यावेत. त्यावर तोडगा काढावा. चर्चेतून तोडगा निघाला नाही तर या चर्चेत जे मुद्दे आले त्यावरून आपण काही पर्याय काढू, असा सल्ला शरद पवार यांनी सामंत यांना दिला आहे. याचप्रमाणे विरोधक आणि अधिकाऱ्यांची बैठक घ्या अशी सूचना उदय सामंत यांना केली. उद्याच्या उद्या शासनाचे प्रतिनिधी आणि आंदोलकांचे प्रतिनिधी बसून चर्चा करतील. या बैठकीतील निष्कर्ष सरकारला देऊ, असं देखील सामंत म्हणाले. याचप्रमाणे रिफायनरीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं ही शेवटची स्टेप असते. ती स्टेज आलेली नाही. त्यावर चर्चाही झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणी भाष्य करत म्हटलं होत की, कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्यामुळे तेथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नसून महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. तर बारसू गावात सध्या रिफायनरीच्या ठिकाणी बोअर मारले जात आहेत. ही जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचं अहवाल आल्यानंतर रिफायनरी उभी राहणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-