Basavaraj Bommai | सीमा प्रश्नावरील सुनावणीवर बसवराज बोम्मईंची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमची बाजू संवैधानिक आणि…”
Basavaraj Bommai | कर्नाटक : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या सुनावणीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या राज्याची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा अर्ज ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद आमच्या वकिलांनी केला आहे”, असं ते म्हणालेत.
आमची बाजू संवैधानिक आणि कायदेशीर आहे”, असं मत बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मांडलं आहे. सीमावादासंदर्भात कर्नाटकच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत.
कर्नाटक सरकारने सोलापूर, अक्कलकोट आणि जतमधील ४० गावांवर हक्क सांगितल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. बोम्मईंच्या या दाव्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षांकडून सडकून करण्यात येत आहे.
“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगितला आहे. त्यामुळं हे सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत”, अशी टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | बेईमान व्यक्तीशी शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान – संजय राऊत
- Udayanraje Bhosale | “राज्यपालांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा”; उदयनराजे भोसले यांची सडकून टीका
- One Day International | ODI क्रिकेट संपणार?, FICA ने जाहीर केला रिपोर्ट
- Sanjay Raut | “…तर तुम्ही मूर्ख आणि खोटारडे आहात”; उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- Sam Bahadur Teaser | ‘या’ दिवशी रिलीज होणार विकी कौशलचा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ बायोपिक
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.