Basavaraj Bommai । “तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना इशारा

Basavaraj Bommai । कर्नाटक : महाराष्ट्रासंदर्भात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने समिती स्थापन केली आहे. मात्र, कर्नाटक सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. आता कर्नाटकने नवा उपद्रव केला आहे. सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीच्या जत तालुक्यावर दावा करण्याबाबत कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले आहे.

यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, “महाराष्ट्रातील एकही गाव कोठेही जाणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणी यांच्यासह सर्व गावं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.” फडणवीसांच्या या वक्तव्यावर बसवराज बोम्मई यांनीं ट्विट करत इशारा दिला आहे.

“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले की “कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या राज्यात समाविष्ट केले पाहिजेत.” तसेच २००४ पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेलं नाही आणि मिळणारही नाही. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तयार आहोत,असा इशाराही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.