बीबीसीच्या मते, काश्मीर आहे स्वतंत्र देश

ब्रिटिश ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन म्हणजे बीबीसीची हिंदी बातमी देणारी संस्था एका वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. बीबीसीने केलेल्या एका सर्वेमध्ये काश्मीरला एक वेगळा देश असल्याचे दाखवण्यात आले आहे.

बीबीसी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे करत असते. शनिवारी केलेल्या एका सर्वेमध्ये ब्राउजर उघडताच हा सर्वे दिसत होता. यामध्ये वाचकांची आवड विचारली जात होती. या सर्वेमध्ये भाग घेणाऱ्या वाचकांना व्यक्तीगत माहिती देखील द्यावी लागत होती. यामध्ये वाचकांना तुम्ही जन्मलेला देश कोणता ? आणि आता तुम्ही कोणत्या देशात राहता असा प्रश्न विचारला होता ? यामध्ये देशांची निवड करताना, पाकिस्तान, भारत यांच्याबरोबर काश्मीरचा देखील पर्याय होता. बीबीसीच्या अनेक सर्वे तसेच अनेक ठिकाणी काश्मीरला स्वतंत्र देश असल्याचे सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.