बीसीसीआयने विराट कोहलीला हटवले! रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा कर्णधार

नवी दिल्ली : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल जाहीर आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विराटच्या या निर्णयाचा क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर टी-20 विश्वचषक क्रिकेट संघाची कमान भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माकडे सोपवण्यात आली.

यानंतर आता भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी देखील रोहित शर्माची वर्णी लागली आहे. रोहित शर्माला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुढील वर्षी T20 विश्वचषक आणि 2023 मध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक खेळेल. यासोबतच रोहितकडे कसोटी संघाचे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. BCCI ने बुधवार, 8 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली आणि त्यासोबतच, वरिष्ठ निवड समितीने कसोटी आणि मर्यादित षटकांसाठी वेगवेगळे कर्णधार ठेवण्याच्या निर्णयालाही मान्यता दिली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा