InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सावधान! ‘स्वाईन फ्लू’ येतोय

स्वाईन फ्लू पासून वाचण्यासाठी?

सध्या वातावरणात बदल होत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात स्वाईन फ्लूचे जानेवारी पासून आतापर्यंत 87 रुग्णांचे बळी गेले आहेत. स्वाईन फ्लू इन्फ्ल्यूएंझा ए एच-1, एन-1 या विषाणू पासून होतो. वेळीच उपचार आणि योग्य काळजी घेतली तर या आजारावर मात करणे शक्य आहे. म्हणून घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही.
? स्वाईन फ्लूची लक्षणे
स्वाईन फ्लूची लागण झाली असल्यास प्रामुख्याने ताप, थंडी वाजणे, कफ, घशात खवखव होणे, अंगदुखी आणि डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात.
? स्वाईन फ्लू पासून वाचण्यासाठी?
 •  तुम्ही आजारी असाल तर घरी रहा. तुमच्या घरी कुणी आजारी असेल तर त्याच्यासोबत जास्त फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवू नका.
 •  सर्दी किंवा खोकल्याने विषाणू तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवा व इतरांनाही ठेवायला सांगा.
 •  दिवसभरात आपण हाताने अनेक वस्तूंना स्पर्श करत असतो. त्यामुळे हाताला स्वाईल फ्लूचे विषाणू लागण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गरम पाण्याने तुमचे हात वारंवार धुवा. नाक, डोळे आणि तोंडाला हाताने स्पर्श करु नका.
 •  दररोज आठ तास झोप घ्या. जास्त झोप घेतल्याने तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे तुम्हाला या विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
 •  दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील दूषित पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होईल व शरीर तंदुरुस्त राहिल.
 •  या काळात तुमचा आहार संतुलित ठेवा. भरपूर फळे, पालेभाज्या यांचे सेवन करा. फॅटी फुड शक्यतो टाळा यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो.
?रुग्णाची घरगुती काळजी कशी घ्याल
 •  घर मोठे असेल तर रुग्णांची व्यवस्था वेगळ्या खोलीत करावी.
 •  रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत ज्या ठिकाणी सर्व कुटुंबीय असतील तेथे येणे टाळावे.
 •  रुग्णाने नाकावर रुमाल बांधावा.
 •  रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी.
 •  रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णांचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी ब्लीचचा वापर करावा.
 •  रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतरत्र टाकू नयेत.
 •  रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात/ब्लीचमध्ये अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत.
 •  रुग्णाचे अंथरूण, पांघरूण, टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
 •  रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी भरपूर पाणी आणि द्रव्य पदार्थ प्यावेत.
 •  डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
 •  दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्यात. गरम पाण्यात निलगिरी तेल/मेंथॉल टाकून त्याची वाफ घ्यावी.
 •  ताप आणि फ्लूची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान चोवीस तासांपर्यंत घरी राहावे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply