‘विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा’; आरएसएस चा भाजपाला संदेश

शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. घोडेबाजाराच्या घाडेरडया राजकारणात पडू नका. दीर्घकाळाचा विचार करता भाजपासाठी ते हिताचे राहणार नाही असे भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.