InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी

सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी असल्याचा परिणामी स्थानिक बाजार समितीतही दिसून येत आहे. यंदाचे हमीभाव ३ हजार ७१० रुपये असताना आवक कमी व पावसामुळे मालाचा दर्जा घसरल्याने राणी प्रतीच्या सोयाबीनला बुधवारी ४२०० रुपये दर मिळाला.

दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे एटीत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. सोयाबीन सवंगणीच्या वेळेतच उद्भवलेल्या त्या परिस्थितीमुळे सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना फारच कसरतीचे ठरले. काहींना मजुरांअभावी पावसात सोयाबीन झाडावरच ओला होऊ द्यावा लागला, तर काहींनी संवंगणी करून सोयाबीनची गंजी लावली.

Loading...

काहींनी पावसाच्या मोसमातच सोयाबीन काढला. त्यामुळे ओला असताना काढलेला सोयाबीन तडण मिळू न शकल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांना तो तशाच अवस्थेत विकावा लागला. जिल्ह्यात प्रत खराब झालेल्या सोयाबीनचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याने काहींनी आधीच विकला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शासनाने जाहीर केलेला हमीभाव ३ हजार ७१० असताना आवकच्या तुलनेत सोयाबीनला सध्या ३९८१ ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे..

- Advertisement -

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.