राजीनामे मागे घ्या;अन्यथा पक्षांतरबंदीअंतर्गत कारवाई करू करू

- Advertisement -
सर्व बंडखोर आमदारांनी तत्काळ बंगळूरला परतून राजीनामे मागे घ्यावेत; अन्यथा पक्षांतरबंदीअंतर्गत कारवाई होईल, असा इशारा काँग्रेस आणि निजद या दोन्ही पक्षांनी बंडखोरांना दिला आहे. तसेच तशी रीतसर तक्रारही सभापती के. आर. रमेशकुमार यांच्याकडे केली असून, राजीनामे न स्वीकारता पक्षांतरबंदी कायद्याचा वापर करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, तेरापैकी केवळ पाचच आमदारांचे राजीनामे नियमानुसार आहेत. उर्वरित आठ जणांचे राजीनामे नियमबाह्य असून, त्यांना नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती सभापतींच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
Related Posts
- Advertisement -
काँग्रेस विधिमंडळ नेते सिद्धरामय्या यांनी सभापती रमेशकुमार यांची भेट घेऊन प्रतापगौडा पाटील, बी. सी. पाटील, रमेश जारकीहोळी, शिवराम हेब्बार, महेश कुमठळ्ळी, एस. टी. सोमशेखर, भैरती बसवराजू, मुनिरत्न, आनंद सिंग यांच्याविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी तक्रार दिली.
महत्वाच्या बातम्या-
Loading...
- कर्नाटकमधील ‘त्या’ आमदारांच्या मनधरणीसाठी मंत्री डी.के. शिवकुमार आज मुंबईत
- म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घर
- मुख्यमंत्र्यांसोबत रिक्षा संघटनेची बैठक संपन्न; रावतेंची मात्र गैरहजेरी
- ‘मनसेचे बॉम्बवाटप’; नेमका कुठला राजकीज धमाका करणार?
- विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने घेतले 7 मोठे निर्णय