फेयरनेस क्रीमची जाहिरात करण्यावर भडकली अविका गौर म्हणाली, “गोरेपणाचा अर्थ सुंदरता नाही”

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अविका गौर कायम सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतच अविकला एका फेयरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होतो.  अविकाने ही ऑफर धुडकावून लावल्याची माहिती समोर आली आहे. यावर अविकाने दिलेले उत्तर पाहून चाहत्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

अविका स्पष्टीकरण देत म्हणाली की, “समाजात कोणाच्याही रंग-रूपावरुन भेदभाव करणे योग्य नाही. मी या विचारांना बदलू इच्छिते. आणि याच कारणामुळे मी फेयरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर स्वीकारली नाही”.

पुढे अविका म्हणाली, “सुंदर बनवणार्‍या क्रीम म्हणजेच चेहर्‍यावर उजाळा आणणे आणि गोरेपणाचा अर्थ म्हणजे सुंदरता नाही. मला जाहिरातीतून मिळणार्‍या पैशांची फिकीर नाही. अश्या जाहिरातीचा समाजावर चुकीचा प्रभाव पडतो.  म्हणून मी जाहिरातमध्ये काम करण्यास नाकर दिला.” असे अविकाने सांगितले. तिच्या या उत्तरामुळे अनेकजण तिचे कौतुक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा