“शरद पवारांमुळे, अजित पवारांना राजकारणात संधी मिळाली मात्र त्यांनी घाण केली”

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर शाब्दिक यौद्ध सुरु आहेत. सुरवातीला किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना धारेवर धरलं आहे. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि आता हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एकीकडे हा वाद सुरु असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे.

दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असं म्हणत अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटील अजित पवारांवर बोलल्यामुळे राष्ट्रवादीवाले विस्कटले आहेत. अजित पवार मोठा नेता नाही. त्यांना मोठा नेता मानन्याचं कारण देखील नाही. त्याचबरोबर त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे. परंतु त्यांनी घाण केली आहे. त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या