…यामुळे जेठालाल यांनी करिअरला रामराम करण्याचा घेतला होता निर्णय!

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यात जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण ही मालिका सुरु होण्यापूर्वी जेठालाल यांनी करिअरला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.

माहितीनुसार, दिलीप जोशी ज्या मालिकांमध्ये काम करत होते, त्या सर्व मालिका बंद झाल्या होत्या. त्यामुळे जवळपास वर्षभर दिलीप जोशींकडे कोणतेही काम नव्हते. त्याचदरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांनी दिलीप जोशी यांच्याशी संपर्क साधला.

त्यावेळी असित कुमार मोदी यांनी दिलीप जोशींना एका कॉमेडी मालिकेसाठी विचारणा केली. यावेळी त्यांनी ‘चंपकलाल’ आणि ‘जेठालाल’ यापैकी एकाची निवड करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी दिलीप यांनी ‘चंपकलाल’ ऐवजी ‘जेठालाल’ हे पात्र निवडले. पण असित कुमार मोदी यांच्यामते, दिलीपने ‘चंपकलाल’ची व्यक्तिरेखा साकारावी अशी इच्छा होती, अशी माहिती समोर आली होती.

मात्र दिलीप जोशी यांनी ते कशाप्रकारे जेठालालच्या पात्रासाठी अधिक योग्य आहेत? याचा विश्वास असित कुमार मोदीला दिला. त्यानंतर जे काही घडले ते प्रेक्षकांच्या समोर आहे. ज्या दिलीप जोशी यांना एकेकाळी सिनेसृष्टीला कायमचे रामराम करायचे होते, तेच आता टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते म्हणून ओळखले जातात.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा