InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गिरीश महाजनांच्या ‘या’ वक्तव्यामुळे युतीत ठिणगी पडण्याची शक्यता

- Advertisement -

महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची आज मुंबईतील वसंतस्मृती इथं महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला, असा दावा महाजन यांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्रिपदाबाबतही भाष्य केलं आहे.

- Advertisement -

Loading...

‘लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला. जिथे शिवसेना कमकुवत होती त्या ठिकाणी आम्ही मदत केली,’ असा गिरीश महाजन यांनी केला आहे. तसंच महाजन यांनी केला.

‘सर्वांची भावना आहे की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा,’ असं म्हणत गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रिपद पुन्हा भाजपकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे युतीत संघर्षाची ठिणगी पडू शकते.

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.