‘शरद पवारांना पंतप्रधान पद मिळालं नाही म्हणून…’; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

गोवा : नवी मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि, तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं जाहीर विधान फडणवीसांनी यावेळी बोलताना केलं होत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, असंही शरद पवार म्हणाले. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. त्यामुळे मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले कि, “शरद पवार मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही त्यांची वेदना त्यांच्या मनात सलत आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणात बोलाव्या लागतात. तुमच्या विरोधकांना उत्तरे द्यावी लागतात. सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे कुठल्याही पक्षाला वाटते पण आम्ही हातपाय गाळून बसलेलो नाही. विरोधी पक्षाचे उत्तम काम करत आहोत आम्हाला काही चिंता नाही,” असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा