InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बीड सत्र न्यायालयाची अनोखी शिक्षा; वाळूचोरट्यांना ‘वॉटर कप’साठी करायला लावले श्रमदान

बीडमध्ये भर उन्हात हातात कुदळ-फावडं घेऊन गेवराईचे सहा युवक बांधबंधिस्ताचे काम करत आहेत. या युवकांनी स्वतःला स्वेच्छेने श्रमदानात झोकून दिलेले नाही, तर बीड सत्र न्यायालयाच्या एका आदेशाने त्यांच्यावर श्रमदानाची वेळ आली आहे. वाळू चोरी करणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून कडक शिक्षा करताना आपण पाहिले आहे. मात्र, बीडच्या न्यायालयाची ही शिक्षा अनोखी म्हणता येईल.

4 ऑगस्ट 2017 रोजी अवैध वाळू उत्खनन होत असल्याची बाब गेवराईचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांच्या लक्षात आली. त्यानंतर आरोपी तरुणांचा ट्रॅक्‍टर ताब्यात घेऊन तांबारे यांनी कारवाई केली. मात्र कारवाईचा राग अनावर झाल्याने सहा जणांनी तांबारेंना गंभीर मारहाण केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.