InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे

अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड यांची शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेने अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मृत विजय जोगदंड यांना श्रध्दाजंली वाहिली आहे.

तसेच या घटनेवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, ‘अंबाजोगाईत नगरसेवकाची झालेली हत्या दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. मृत विजय जोगदंड यांना श्रद्धांजली. बीडच्या कायदा-सुव्यवस्थेत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. बीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे’.

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.