InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मधमाश्या चावल्या आणि वृ्द्धाचा मृत्यू झाला

- Advertisement -

मधमाशांच्या चावण्याने एका ७५ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वानवडी परिसरातील गवळी-धाडगे नगरमध्ये घडलीय.

गवळी-धाडगे नगर परिसरातील इमारतीत गवळी कुटुंबीयांच्या घरी बाबासाहेब गवळी यांच्या दशक्रिया विधीनिमित्त २०० हून अधिक पाहुणे घरी जमले होते. या पाहुण्यांचे जेवण सुरू असताना हा प्रकार घडला.

- Advertisement -

या इमारतीत असलेल्या मधमाशांचा पोळ्यातून हजारोंच्या संख्येनं मधमाश्या अचानक बाहेर आल्या आणि गवळी कुटुंबाच्या घरी शिरल्या. मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी मंडळीप्रमाणेच ७६ वर्षाचे दत्तात्रय गवळीदेखील रस्त्याच्या दिशेने पळू लागले. परंतु, त्याचवेळी मधमाशांनी दत्तात्रय गवळी यांच्या चेहऱ्याचा चावा घेतला, काही मधमाशा त्यांच्या नाका-तोंडात शिरल्या. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.

मधमाशांच्या हल्ल्यात घरातील इतर ५-६ सदस्यदेखील जखमी झाले असून त्यांच्यावर ईनामदार दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.