Beetroot Peels | केसांची समस्या दूर करण्यासाठी बिटाच्या सालीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beetroot Peels | टीम महाराष्ट्र देशा: बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बिटाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्याचबरोबर बीटाच्या सालीच्या मदतीने केसांच्या समस्या (Hair problem) सहज दूर होऊ शकतात. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केसांशी संबंधित समस्यांना तोंड देत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी बीटाची साल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला बीटाची साल स्वच्छ धुऊन बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर त्या मिश्रणामध्ये तुम्हाला तीन चमचे लिंबाचा रस मिसळावा लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसांच्या पुढील समस्या सहज दूर होऊ शकतात.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth-Beetroot Peels)

केसांची वाढ वाढवण्यासाठी बीटरूटची साल फायदेशीर ठरू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म केसांना पोषण देऊन मजबूत बनवतात. बीटरूटच्या सालीचा हेअर मास्क आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्याने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते.

केस गळती थांबते (Hair loss stops-Beetroot Peels)

केस गळती नियंत्रणात ठेवण्यासाठी बीटरूटच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो. बीटरूट सालीच्या मिश्रणाच्या मदतीने केस गळती थांबू शकते. त्यामध्ये आढळणारे गुणधर्म टाळूचे रक्त परिसंचरण वाढवण्यासाठी आणि केसांची छिद्रे उघडण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते.

केसातील कोंडा दूर होतो (Removes dandruff-Beetroot Peels)

तुम्ही जर केसातील कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर बीटरूटीच्या सालीचे मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म टाळू आणि केसांमधील घाण दूर करण्याचे काम करतात. परिणामी कोंड्याची समस्या दूर होते.

बीटरूटच्या सालीचा वापर केल्याने केसांच्या वरील समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर सुंदर आणि जाड आयब्रोसाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

आवळा (Amla-Eyebrow Care)

आवळा आपल्या आरोग्यासोबतच आयब्रोसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये पाच ते सहा आवळ्याचे तुकडे उकळून घ्यावे लागेल. हे मिश्रण थोडे घट्ट झाल्यानंतर तुम्हाला ते कापसाच्या साहाय्याने साधारण वीस मिनिटे आयब्रोवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयब्रो सामान्य पाण्याने धुवाव्या लागतील. आवळ्याच्या मदतीने आयब्रो काळ्या आणि दाट होऊ शकतात.

कांदा (Onion-Eyebrow Care)

आयब्रोची काळजी घेण्यासाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला साधारण वीस मिनिटे कांद्याचा रस आयब्रोवर लावून ठेवावा  लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचं चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. कांदा केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो. त्यामुळे आयब्रोची काळजी घेण्यासाठी कांदा फायदेशीर ठरू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या