Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
Beetroot Peels Benefits | टीम कृषीनामा: बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बिटाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीर हायड्रेट राहते. त्याचबरोबर बीट हे आपल्या शरीरातील रक्तासाठी खूप उपयुक्त मानले जाते. बीटाच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध होते आणि रक्ताची कमतरता देखील पूर्ण होते. बीटामध्ये फॉलेट, आयरन, मॅगनीज, पोटॅशियम इत्यादी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म शरीराला पोषण देतात. बीटासोबत त्याची सालही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीटाची साल आपल्या त्वचेच्या (Skin Care) अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. त्वचेच्या पुढील समस्यांसाठी बीटाची साल फायदेशीर ठरू शकते.
त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते (Remove dead skin – Beetroot Peels Benefits)
त्वचेवरील डेड स्किनमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. डेड स्कीनमुळे पिंपल्स आणि फ्रिंकल्स येऊ लागतात. या समस्या टाळण्यासाठी बीटरूटची साल तुमची मदत करू शकते. यासाठी तुम्हाला बीटाचे साधारण तीन ते चार साल काढून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या सालींची पेस्ट बनवून त्यामध्ये बेसन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते सुमारे अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. ही पेस्ट कोरडी झाल्यावर तुम्हाला ती रगडून चेहऱ्यावरून काढावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील डेड स्कीन निघून जाऊ शकते.
त्वचेचा रंग सुधारतो (Improves skin tone – Beetroot Peels Benefits)
तुम्हाला जर तुमच्या त्वचेचा रंग सुधारायचा असेल तर तुम्ही बीटरूटच्या सालीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला बीटाचे साधारण दोन मोठे साल काढून घ्यावे लागेल. ही साल तुम्हाला साधारण एक कप पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्ही त्वचेचा रंग सुधारण्यासाठी या पाण्याचा उपयोग टोनर म्हणून करू शकतात. नियमित या टोनरच्या वापराने तुमच्या त्वचेचा रंग सुधारू शकतो.
त्वचा हायड्रेट राहते (Skin stays hydrated – Beetroot Benefits)
बीटामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे बीटाचे नियमित सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे बीटाचे सेवन केल्याने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर होऊन त्वचा हायड्रेट राहते. परिणामी त्वचा मऊ आणि चमकदार होते.
त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे दूर होतात (Eliminates signs of aging – Beetroot Benefits)
आजकाल कमी वयात त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसायला लागतात. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही नियमित बीटाचे सेवन करू शकतात. कारण यामध्ये माफक प्रमाणात विटामिन सी आणि ए आढळून येते. त्यामुळे नियमित बीटाचे सेवन केल्याने त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
Comments are closed.