कोर्टात हजेरी लावण्याआधी राज कुंद्राने इशारे पाहून संतापले नेटकरी म्हणाले…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी शुक्रवारी २३ जुलै रोजी राजला भायखळा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात हजर करण्यापूर्वीचे राज कुंद्राचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये त्याचे इशारे पाहून सोशल मीडियावर त्याचा प्रचंड ट्रोल करण्यात येतंय.

राज कुंद्राला जेव्हा भायखळा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यासाठी नेलं जातं होत त्यावेळी राजचे काही फोटोज काही फोटोग्राफरने क्लिक केले. यावेळी राज कुंद्रा एकदम शांत दिसून आला. पण फोटो क्लिक करत असताना तो विक्ट्री साइन दाखवत हात जोडताना दिसून आला. त्याचे हे इशारे करतानाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरू लागले.

हे फोटो पाहून नेटकरी राज कुंद्रावर खूपच भडकले आहेत. सोशल मीडियावर राज कुंद्राला प्रचंड ट्रोल करण्यात येतंय.
राज कुंद्राच्या या हावभावामुळे सोशल मीडियावर त्याला युजर्स ‘निर्लज्ज’ म्हणताना दिसून येत आहेत. ‘फॉल ऑफ शेम’, ‘नमस्कार तर पहा कसा करतोय…गर्वाचं काम केलंय ना याने..’, ‘आजची ही विक्ट्री साइन नाही, घमंडची साइन आहे…कर्म हिशोब ठेवतो’, यासारख्या अनेक कमेंट्स राज कुंद्राच्या या फोटोवर दिसून येत आहेत.

तसेच 23 जुलै रोजी न्यायालयाने राज कुंद्राची 27 जुलैपर्यंत वाढवली आहे. पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा ऑनलाइन बेटिंगमध्ये वापरण्यात आल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली असता याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केलेली होती.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा