82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही, शरद पवारांचा विरोधकांना इशारा

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन २०१९ मध्ये राज्यात महाविकासाआघाडीच सरकार स्थापन केलं. आणि विरोधकांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काल शरद पवार यांचा उस्मानाबाद दौरा सुरु होता. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्यात. उस्मानाबादमध्ये शरद पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं.

तसेच यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं. तर पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेलं पक्षांतर, उस्मानाबादचा पाणी प्रश्न, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य, देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर शरद पवारांना टोले मारले. तर, उद्धव ठाकरे चांगला राज्य कारभार चालवत आहेत, असं शरद पवार म्हणाले.

तसेच पुढे शरद पवार म्हणाले. सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं.

तसेच पुढे देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधिमंडळात लोकांनी मला एकही दिवस सुट्टी दिली नाही. त्या लोकांचे भविष्य चा विचार करायची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही मला काय द्यायचं ठेवलं नाही. 4 वेळ मुख्यमंत्री, 52 वर्षांपासून निवडून देताय, पुढील काळ लोकांच्या जीवन आणि गावं समृद्ध करण्यासाठी देणार आहे, असं शरद पवार म्हणाले. कोणाला सांगताय म्हतारा झालोय जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या