Belly Fat | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या काळात बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहे. अनेकदा वजन कमी होते मात्र पोटाची चरबी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये काही गोष्टींचा समावेश करू शकतात. या पदार्थांचे सेवन केल्याने पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींचा ब्रेकफास्टमध्ये समावेश करू शकतात.
पोहे (Poha-Belly Fat)
पोहे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आढळून येते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. त्यामुळे पोह्यांचे सेवन केल्याने पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. पोहे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे पोह्यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
अंडी (Egg-Belly Fat)
अंड्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट इत्यादी गुणधर्म उपलब्ध आहे. त्यामुळे अंड्याचे सेवन केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकतो. त्याचबरोबर अंडी खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार सहज दूर होऊ शकतात. अंड्याचे सेवन केल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात.
उपमा (Upma-Belly Fat)
उपमा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. उपमा खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये उपम्याचा समावेश करू शकतात.
पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये वरील गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील ड्रिंक्सचा समावेश करू शकतात.
बनाना शेक (Banana Shake-For Weight Gain)
वजन वाढवण्यासाठी तुम्ही बनाना शेकचे सेवन करू शकतात. बनाना शेक प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास दूध आणि दोन केळी मिक्सरमध्ये चांगले मिसळून घ्यावे लागेल. नियमित बनाना शेकचे सेवन केल्याने वजन वाढू शकते.
चॉकलेट मिल्क (Chocolate milk-For Weight Gain)
चॉकलेट मिल्क बहुतांश लोकांना प्यायला आवडते. चॉकलेट मिल्क प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम आढळून येते. नियमित चॉकलेट मिल्कचे सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास दुधामध्ये डार्क चॉकलेट मिक्सरमध्ये मिसळून घ्यावी लागेल. नियमित चॉकलेट मिल्कचे सेवन केल्याने तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल.
मँगो शेक (Mango Shake-For Weight Gain)
मँगो शेक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि विटामिन्स आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. दररोज एक ग्लास मँगो शेक प्यायल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. यासाठी तुम्हाला आंब्याचा पल्प आणि दूध मिक्सरमध्ये एकत्र करून घ्यावे लागेल. नियमित या पेयाचे सेवन केल्याने वजन वाढू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज
- Balasaheb Thorat | “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण आमची संधी घालवली”; थोरांतांनी बोलून दाखवली मनातली सल
- Nana Patole | “आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”; सेना-भाजपच्या वादावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- Ramdas Athawale | भाजप-शिवसेना जागावाटपाच्या वादावर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य