Benefits of Pulses | टीम कृषीनामा: कडधान्य आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयरन, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रस आढळून येतात. कडधान्य खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. त्याचबरोबर कडधान्याचे नियमित सेवन केल्याने हृदय देखील निरोगी राहू शकते. याचे नियमित सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते परिणामी वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर कडधान्य खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा आणि थकवा दूर होतो. नियमित कडधान्याचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.
पचनसंस्था मजबूत राहते (Digestive system remains strong-Benefits of Pulses)
नियमित कडधान्याचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहू शकते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर डाळींचे नियमित सेवन केल्याने गॅस, ऍसिडिटी आणि पोट फुगणे यासारख्या समस्या देखील दूर होतात. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी त्यांच्या आहारात आवर्जून कडधान्याचा समावेश केला पाहिजे.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Benefits of Pulses)
नियमित कडधान्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर संसर्गजन्य आजारांपासून दूर राहू शकते. बहुतांश डाळींमध्ये इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म आढळून येतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दीर्घकार निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात डाळींचा समावेश केला पाहिजे.
शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघते (This fills up the lack of protein in the body-Benefits of Pulses)
शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी कडधान्य मदत करू शकतात. कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायूंचा त्रास सहज दूर होतो. त्याचबरोबर डाळींचे नियमित सेवन केल्याने थकवा आणि आळस देखील दूर होतो. त्यामुळे शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळींचा समावेश केला पाहिजे.
डाळींचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर मसल गेन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.
शेंगदाणे (Peanuts For Muscle Gain)
शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. कोणत्याही ड्रायफ्रूटच्या तुलनेमध्ये शेंगदाण्यात जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये माफक प्रमाणात 20 ओमीनो ॲसिड देखील उपलब्ध असते. मसल्स गेन करण्यासाठी शेंगदाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
बीन्स (Beans For Muscle Gain)
मसल्स गेन करण्यासाठी बीन्सचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि अमिनो ॲसिड आढळून येते. एक कप बीन्समध्ये सुमारे 15 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे मसल्स गेन करण्यासाठी बीन्सचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.
पनीर (Paneer For Muscle Gain)
पनीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. 100 ग्राम पनीरमध्ये 20 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे मसल्स गेन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीरचा समावेश करू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या